शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पाकच दहशतवाद्यांचा आश्रयदाता

By admin | Updated: September 27, 2016 05:43 IST

भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी

संयुक्त राष्ट्रे : भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे, असे बजावताना, पाकिस्तान बलुचिस्तानात अत्यंत क्रूर अशी सरकारी दडपशाही करीत असल्याचा हल्ला भारताने केला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो मिळविण्याचे स्वप्न बघणे पाकिस्तानने सोडून द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भाषणात नुकत्याच केलेल्या भारतावरील हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांनी ज्यांना दहशतवादी जाहीर केले आहे ते उघडपणे फिरतात आणि द्वेषपूर्ण भाषणे करीत असतात, असा अप्रत्यक्ष उल्लेख स्वराज यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याचा केला. अतिरेक्यांना आश्रय देणे हा काही देशांचा व्यवसाय झाल्याचे त्या म्हणाल्या. काही देश असे आहेत की जे दहशतवादाची भाषा बोलतात, त्याला पोसतात, तो विकतात व निर्यातही करतात. असे देश आम्ही ओळखले पाहिजेत आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे स्वराज म्हणाल्या. नवाज शरीफ यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, जे काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नये. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी बलुचिस्तानसह होणारे अत्याचार आधी पाहावेत. बलोच लोकांना क्रौर्याला तोंड द्यावे लागत आहे आणि ती दडपशाही सरकारच करीत आहे. दहशतवादामुळेच सर्वाम मोठे मानवी हक्क उल्लंघन होते आणि दहशतवाद सगळ््यात मोठा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे हे समजून घ्यावे. दहशतवाद निष्पापांना लक्ष्य करतो व अविचाराने हत्या करतो, असे स्वराज यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या मालकीच्या बँका नसतात की शस्त्रेही. त्यामुळे आम्ही खरा प्रश्न विचारला पाहिजे की दहशतवादाला कोण पैसा पुरवतो, कोण त्याला शस्त्रे देऊन आश्रयही देतो. (वृत्तसंस्था)आमचा मैत्रीचा हात; त्यांच्याकडून मात्र हल्लेचर्चेसाठी भारत अटी घालतो हा पाकचा दावा त्यांनी फेटाळला. आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी अटींवर नव्हे, तर मैत्रीतून पुढाकार घेतला. पण त्यांनी पठाणकोट आणि उरी येथे हल्ले घडवून आणले. असल्या हल्ल्यांच्या माध्यमातून भूभाग मिळवता येईल, असे त्यांना वाटत असल्यास ते कधीही यशस्वी होणार नाहीत.