शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ला: SP सलविंदर सिंहना एनआयएची क्लीन चीट

By admin | Updated: January 23, 2016 10:17 IST

पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलीसचे वरीष्ठ अधिकारी सलविंदर सिंग यांना एनआयएने क्लीन चिट दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २३ - पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलीसचे वरीष्ठ अधिकारी सलविंदर सिंग यांना एनआयएने क्लीन चिट दिली आहे. सिंह यांची घेण्यात आलेली वैज्ञानिक चाचणी तसेच लाय डिटेक्टर चाचणीतही काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. 
अधिक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत असलेले सलविंदर सिंग गुरुवारी एनआयएच्या दिल्लीतील मुख्यालयात आले होते. तेथे त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले व त्यानंतर त्यांची लाय डिटेक्टर चाचणीही घेण्यात आली होती, पण त्यात काही आढळले नाही. 
पठाणकोटच्या तळावर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर सर्वप्रथम सलविंदर सिंग यांचे अपहरण केले व काहीवेळाने त्यांना सोडून दिले. ३१ डिसेंबरच्या रात्री मी पाकिस्तानच्या सीमेजवळ असणा-या गुरुव्दारा येथे  दर्शनासाठी चाललो असताना अतिरेक्यांनी आमच्या गाडीचा मार्ग रोखला. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी माझे हात-पाय बांधले, डोळयावर पट्टी बांधली होती. रात्रीचीवेळ असल्याने नेमके किती अतिरेकी होते ते ओळखता आले नाही असे या घटनेसंदर्भात सलविंदर सिंग यांनी सांगितले होते. मात्र सलविंदर सिंह यांनी चौकशीमध्ये एनआयएला जी माहिती दिली त्यामध्ये विसंगती दिसत असल्याने नेमके सत्य शोधण्यासाठी त्यांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.