शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ला पाकमधूनच, अमेरिकेने दिले भारताला पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 21:32 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या हल्ल्याप्रकरणी जैश ए मोहंमद प्रमुख मसूद अझहरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याच्या पर्यायाची चाचपणी करीत असतानाच ही घडामोड घडली.

जानेवारीतील या हल्ल्याचे सूत्रधार असलेले जेईएमचे दहशतवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटचा आणि संघटनेची आर्थिक शाखा असलेल्या अल रहमत ट्रस्टच्या वेबसाईटचा आयपी अ‍ॅड्रेस पाकमधील असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अमेरिकेने एनआयएला दिली आहे. जैशचा दहशतवादी कासिफ जान याचे मित्र फेसबुकवरील जिहाद, जेईएमशी संबंधित ग्रुपचे सदस्य असून, या ग्रुपच्या पानावर पठाणकोट हल्ल्यात मारले गेलेले चार दहशतवादी नासिर हुसैन, हाफिज अबू बकर, उमर फारुक आणि अब्दुल कय्युम यांचे फोटो आहेत.

हल्ल्याच्या वेळी अल रहमत ट्रस्टचे वेबपेज रंगोनूर डॉट कॉम आणि अलकआलम आॅनलाईन डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. तारिक सिद्दीकी नावाची व्यक्ती या दोन्ही साईटस्चे काम पाहतो. रफाह ए आलम सोसायटी, मालिर, कराची असा या वेबसाईटस्चा पत्ता आहे. या सर्व वेबसाईटस् आणि आयपी अ‍ॅड्रेस पाकमधील असून, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी अपलोड करण्यात आले होते, याची अमेरिकेने पुष्टी केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केल्यानंतर पठाणकोट येथून हल्लेखोर ज्या मोबाईल क्रमांकावर जानशी बोलत होते, तोच क्रमांक जान त्याच्या फेसबुक अकाऊंटसाठी वापरत होता, असे तपासात आढळून आले.

दहशतवाद्यांनी पाकमधील आणखी एका दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला होता. हा क्रमांक मुल्ला दादुल्ला याच्या फेसबुक अकाऊंटशी संलग्न होता. पठाणकोट हल्ल्याच्या वेळी ही खाती आणि आयपी अड्रेस वापरण्यात आला होता, असेही तपासात आढळून आले.