शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

संसद कँटीनमधील भरमसाट सबसिडीचा वाद रंगणार

By admin | Updated: June 25, 2015 00:00 IST

संसदेतील खासदारांना स्वादिष्ट भोजनावर दिल्या जाणाऱ्या भरमसाट सबसिडीचा वाद रंगू लागला आहे. या मुद्यावर चर्चा होत आहे ही

नवी दिल्ली : संसदेतील खासदारांना स्वादिष्ट भोजनावर दिल्या जाणाऱ्या भरमसाट सबसिडीचा वाद रंगू लागला आहे. या मुद्यावर चर्चा होत आहे ही चांगली बाब असून त्यातून काहीतरी विधायक तोडगा निघेल, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. वाढत्या सबसिडीसाठी मंत्री या नात्याने मी एकटा जबाबदार नाही. संसदीय समित्यांनी या मुद्याकडे लक्ष घालावे, असेही त्यांनी सुचविले.आकाशाला भिडलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना सर्वसाधारण जेवणावरील खर्चही आवाक्याबाहेर जात असताना दरमहा १.४ लाख रुपये वेतन आणि भत्ते असलेल्या खासदारांना लज्जतदार भोजनावर भरमसाट सबसिडी कशासाठी? हा मुद्दा आता चर्चिला जात आहे. महागाईत सातत्याने वाढ होत आहे, संसदेच्या कँटीनमधील दरात मात्र कोणतेही बदल झाले नसून गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या भोजनावर ६०.७ कोटी रुपयांची सबसिडी दिली गेली.संसदेत वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा कार्यरत असते. लोकसभा आणि राज्यसभेच्या स्वत:च्या सभागृह समित्या आहेत. वाढत्या सबसिडीबद्दल चिंता व्यक्त होत असताना या समित्यांनी या मुद्याकडे लक्ष द्यायला हवे, असे नायडू यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. संसद कँटीनमधील भोजनावर दिली जाणारी सबसिडी रद्द करणार काय? या प्रश्नाचे उत्तर टाळत ते म्हणाले की, सबसिडी बऱ्याच काळापासून दिली जात आहे. भाजप सरकारचा हा निर्णय नाही. दरम्यान, काँग्रेसने भरमसाट सबसिडी देण्याच्या मुद्यावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी सुधारणात्मक मार्ग अवलंबण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी स्पष्ट केले. त्यांनी विविध मंत्रालयांकडून सबसिडीच्या दरात कँटीन चालविल्या जात असल्याकडे लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)