शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचा पुढील आठवडा विधेयकांचा

By admin | Updated: March 8, 2016 16:19 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षेनुसार शांततेत कामकाज पार पडल्याने उत्साहित सरकारने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी डझनभर विधेयके आपल्या अजेंड्यात ठेवली आहेत

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षेनुसार शांततेत कामकाज पार पडल्याने उत्साहित सरकारने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी डझनभर विधेयके आपल्या अजेंड्यात ठेवली आहेत. कारण १६ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणार असून अवघे १० दिवस शिल्लक आहेत.अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्याने राज्यसभेत कुठलेही कामकाज झाले नाही. परंतु दुसऱ्या आठवड्यात मात्र परिस्थिती बरीचशी निवळली होती. या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये किमान दोन प्रसंगांना सद्भाव दृष्टीस पडला. अर्थात विरोधकांनी रोहित वेमुला आत्महत्या आणि जेएनयूप्रकरणी सरकारवर तीव्र हल्लाबोल केलाच. आता अर्थसंकल्पीय सत्राच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपात अंतरिम जामीन मिळाल्यावर काही दिवसांनी होते आहे. गेल्या आठवड्यात संसदेत देशद्रोह प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्ष संसदेत सरकारला घेरण्यासाठी एकजूट झाले होते. या पक्षांनी सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप केला.सत्राच्या पहिल्या दोन आठवड्यांदरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक २०१६ मंजूर करण्यात आले. भारत आणि बांगला देशदरम्यान भूभागाच्या देवाणघेवाणीनंतर भारताचे नागरिक झालेल्या लोकांना या विधेयकामुळे मतदानाचा हक्क मिळाला आहे. याशिवाय लोकसभेने मंजूर केलेली आणखी दोन विधेयके राज्यसभेने पारित केली आहेत. यात उच्च व सर्वोच्च न्यायालय वेतन व सेवा अटी दुरुस्ती विधेयक २०१५ व हवाई वाहतूक दुरुस्ती विधेयक २०१५ चा समावेश आहे. उभय सभागृहात जेएनयू आणि हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात घडलेल्या घटनांवरही चर्चा झाली.(लोकमत न्यूज नेटवर्क)येणाऱ्या आठवड्यात एकूण १२ विधेयके अजेंड्यात आहेत. यापैकी सात लोकसभेत तर पाच राज्यसभेत आहेत. सोमवारी महाशिवरात्रीची सुटी असल्याने आठवड्याच्या चार दिवसातच ती पटलावर आणायची आहेत. लोकसभेतील विधेयकांमध्ये शत्रू संपत्ती (दुरुस्ती आणि वैधीकरण) विधेयक २०१६, आधार (वित्तीय आणि इतर सबसिडी लाभ व सेवा वितरण) विधेयक २०१६, संविधान (अनुसूचित जाती) आदेश दुरुस्ती विधेयक २०१६ आदींचा समावेश आहे. तर राज्यसभेत भारतीय माणक ब्युरो विधेयक २०१५, व्हिसलब्लोअर संरक्षण दुरुस्ती विधेयक २०१५ आणि राष्ट्रीय जलमार्ग विधेयक २०१६ वर विचार आणि ते पारित होण्याची अपेक्षा आहे. ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली आहेत. यासोबतच वरिष्ठ सभागृहात बालकामगार (बंदी आणि नियमन) दुरुस्ती विधेयक २०१२ चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. याशिवाय रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पाशी संबंधित विनियोग विधेयकावरही चर्चा करून ते लोकसभेत परत पाठविले जाईल.