शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन ठरवण्याचा हक्क संसदेलाच

By admin | Updated: March 24, 2017 00:30 IST

खासदारांचे पेन्शन किती असावे, कोणत्या खासदाराला ते मिळू शकते, हे ठरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्यघटनेने निसंदिग्धपणे स्पष्ट केले

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली खासदारांचे पेन्शन किती असावे, कोणत्या खासदाराला ते मिळू शकते, हे ठरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्यघटनेने निसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे की संसदेशी संबंधित कोणत्या बाबींवर किती व कसा खर्च करावा हा अधिकार फक्त संसदेला आहे. दुसरी कोणतीही संस्था त्यावर अधिकार गाजवू शकत नाही, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरूण जेटलींनी राज्यसभेत केले.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी लोकप्रहरी नामक स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर भाष्य करताना, ८0 टक्के खासदार करोडपती आहेत, असा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्याचे उत्तर देताना न्यायालयाचा उल्लेख न करता जेटली यांनी वरील विधान केले. स्वयंसेवी संस्थेने खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनवर आक्षेप नोंदवणारी याचिका दाखल केली आहे. खासदारकीची मुदत संपल्यावर माजी खासदारांना मिळणारे पेन्शन व भत्ते रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, कारण राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मधे नमूद केलेल्या समानतेच्या तत्वाच्या ते विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.आवश्यक कायदा मंजूर केल्याशिवाय खासदारांना कोणताही लाभ मिळवून देण्याचा संसदेला अधिकार नाही. सध्या माजी खासदार व आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनचा नियमात कोठेही उल्लेख नाही. एक दिवसासाठी जरी कोणी खासदार बनला तर आयुष्यभर पेन्शन मिळण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. इतकेच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही हा अधिकार मिळतो. राज्यांच्या राज्यपालांनादेखील तसा अधिकार नाही. खासदारांसोबत त्यांच्या एका कर्मचाऱ्याला अथवा सहकाऱ्याला मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा आहे. सामान्य जनतेकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांवर हा एक प्रकारे भारच आहे. हायकोर्ट, सुपी्रम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींना देखील ही सुविधा उपलब्ध नाही, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.