प. वर्हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारा
प. वर्हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना
- १८ जिल्ह्यांत योजनेच्या ८०९ प्रकरणांचा निपटारासंतोष वानखडेवाशिम : पशुधन विमा योजनेअंतर्गत राज्यात १८ जिल्ह्यांमधील पशुविम्याची ८०९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश या योजनेत नसल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राज्यात २००६-०७पासून केंद्रपुरस्कृत पशुधन विमा योजना राबविण्यात येते. सुरूवातीला सहा जिल्ह्यांत असलेली ही योजना २०११ पासून १८ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद विभागातील, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, नागपूर विभागातील भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती विभागातील केवळ यवतमाळ या एकमेव जिल्ह्यांचा समावेश आहे. २०१२-१३ या वर्षात १८ हजार ७७४ जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याबाबतची १०५४ प्रकरणं निकाली काढून नुकसानभरपाईपोटी दोन कोटी ७२ लाख रुपये लाभार्थींना वितरित केले होते. २०१३-१४ या वर्षात जवळपास १० हजार जनावरांचा विमा उतरविण्यात आला. ८०९ दावे निकाली काढून दोन कोटी २१ लाख रुपये लाभार्थींना वितरित करण्यात आल्याची नोंद राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या दप्तरी आहे.मात्र, दुसरीकडे या योजनेत पश्चिम वर्हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेशच नसल्याने तेथे पशुपालकांना नुकसानभरपाई कशी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.