शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रोखीच्या व्यवहारांना पॅन कार्डची वेसण?

By admin | Updated: October 5, 2015 03:55 IST

देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्याच्या इराद्याने लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्याच्या इराद्याने लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना लगाम लावण्याचे मनसुबेही त्यांनी बोलून दाखविले. दिलेल्या मुदतीत विदेशातील काळ्या पैशाबाबत माहिती जाहीर न करणाऱ्यांना यापुढे ‘धोका’ आहे. कारण विदेशातून त्यांची माहिती कर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली असेल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.आयकर विभागाच्या देखरेखीखाली व्यवस्था सुदृढ केली जात आहे. करचोरी व करदात्यांबाबतची अन्य माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची मदत होत आहे. जीएसटी लागू होणे, या दिशेने मोठे पाऊल आहे. काळ्या पैशांचा एक मोठा भाग भारतातही आहे. अशा स्थितीत देशाच्या राष्ट्रीय भूमिकेत बदल करण्याची गरज आहे. जेणेकरून ‘प्लॅस्टिक करन्सी’ नियम बनेल. रोख व्यवहार अपवादात्मक स्वरूपात होतील. हा बदल लागू करण्यासाठी विविध प्राधिकरणांसोबत काम सुरू आहे, असे जेटली म्हणाले.करचोरीला आळा घालण्यासाठी... मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी उद्योगांना दिलेले कर्ज केवळ एटीएमद्वारे काढले जाऊ शकेल. आपल्या आधीच्या कर प्रणालीमुळे करचोरीला चालना मिळाली. याला आळा घालण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. तर्कसंगत करप्रणाली, योग्य दराने करआकारणी, कमी उत्पन्न असलेल्या हातांमध्ये अधिकाधिक पैसा खेळवणे, समाजाच्या सर्व वर्गांना प्लॅस्टिक मनीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे असे सरकारचे धोरण आहे. - अरुण जेटली, केद्रींय अर्थमंत्री---------2015-16 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एक लाखापेक्षा अधिक रुपयांच्या खरेदी वा विक्रीसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र या प्रस्तावाविरुद्ध सरकारला अनेक निवेदने मिळाली होती. -----------स्विस बँकेतील ‘सुप्त’ खाती होणार उघडझ्युरिच : ज्यांनी गेल्या ६० वर्षांत कोणतेही व्यवहार केलेले नाहीत अशा सुप्तावस्थेतील (डॉर्मनन्ट) खात्यांचा तपशील स्वित्झर्लंडमधील बँका येत्या डिसेंबरमध्ये प्रथमच उघड करणार आहेत. इतकी वर्षे अत्यंत गोपनीयता बाळगणाऱ्या स्विस बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या भारतीयांसह इतर विदेशी खातेदारांच्या खात्यांची माहिती काही प्रमाणात उघड करून त्यांना त्या देशांच्या कर प्रशासनापुढे सामोरे जायला लावले. त्यानंतर आता सुप्तावस्थेतील खात्यांविषयी हा खुलेपणा स्वीकारला जाणार आहे. -----------स्वित्झर्लंडमधील बँकिंग लोकपालांच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली जाईल. अशा प्रकारे या सुप्तावस्थेतील खात्यांच्या खातेदारांना खात्यातील रकमेवर दावा करण्याची एक संधीही दिली जाईल. काही भारतीयांचीही अशा प्रकारची खाती असण्याची शक्यता आहे.