पान २-औद्योगिक वसाहतींत १० कोटींची कामे
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
औद्योगिक वसाहतींत दहा कोटींची कामे
पान २-औद्योगिक वसाहतींत १० कोटींची कामे
औद्योगिक वसाहतींत दहा कोटींची कामेपणजी : राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण दहा कोटी रुपये खर्चाची साधनसुविधाविषयक कामे केली जाणार आहेत. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.चेअमन गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बुधवारी सायंकाळी पार पडली. मेसर्स अरेबियन मरिन फुड्स उद्योगाला काणकोण येथील औद्योगिक वसाहतीत आणखी १४४ चौ.मी जागा दिली जाणार आहे. राज्यभरातील औद्योगिक भूखंडांच्या दराचा फेरआढावा घेतला जाणार आहे. तुयें, पिसुर्ले, मडगाव येथील औद्योगिक वसाहतींतील कामावर २ कोटी ३५ लाख ७३ हजार रुपये खर्च करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी महामंडळाने दिली आहे. सांगे औद्योगिक वसाहतीत १ कोटी २२ लाख ९० हजार १०० रुपये खर्चून मुख्य रस्ता बांधला जाणार आहे. तुयें येथील वसाहतीतील कामाची फेरनिविदा काढण्यासही महामंडळाने मंजुरी दिली आहे. तुयें औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी ६३९२५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सरकारी जागा हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान, धारबांदोडा येथे औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी ३ लाख चौरस मीटर जागा आयडीसीच्या ताब्यात आहे. आणखी १ लाख ८५ हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जाणार आहे. त्यासाठी जागा पाहण्यात आली आहे. (खास प्रतिनिधी)