पान-२ कुजबूज--२२ डिसेंबर
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
कामगार मिळेना
पान-२ कुजबूज--२२ डिसेंबर
कामगार मिळेनापणजी महापालिकेने आपण संपावरील कामगारांना बडतर्फ करत असल्याचे मोठ्या धाडसाने जाहीर केले. महापालिकेची आक्रमक भूमिका समजण्यासारखी होती; पण पर्यायी कामगार आणणार कुठून, हा मोठा प्रश्न आहे. काही कामगार मडगावहून आणण्यात आले आहेत. मडगाव पालिकेचे कामगार येण्यास तयार नव्हते तरी त्यांना आणले गेले आहे. ही कसरत जास्त दिवस चालणार नाही. पणजी महापालिकेला कामगार मिळत नसल्याने सांतइनेज येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही शक्य होत नाही. पणजीत कचरा अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त पडला आहे. महापालिकेने केवढेही उसने अवसान आणले तरी, आता पर्यायी कामगार मिळणार नाहीत, हे महापालिकेलाही कळाले आहे.गाडगेबाबा व जेवणपर्वरी येथे अखिल गोमंतक मराठा रजक समाजाचा हॉल आहे. समाजाने नुकतेच त्या परिसरात स्वच्छ भारत अभियान राबविले. त्यानंतर समाजाच्या सभागृहात जेवणाचा कार्यक्रम झाला. अनेकजणांना वाटत होते की, संत गाडगेबाबा हॉलमध्ये जेवण देताना समाजाने तरी ते शाकाहारी द्यावे; पण तिथे मांसाहारी जेवण दिले गेले. मासे, चिकन वगैरे खाऊ घातले गेले. काही सदस्यांना ही गोष्ट आवडली नाही, असे सध्या सुरू असलेल्या चर्चेवरून वाटते. गाडगेबाबांच्या हॉलमध्ये मांसाहारी जेवण आपल्या समाजाने तरी देऊ नये, असे काहीजणांना वाटणे स्वाभाविक आहे. एरव्ही हा हॉल भाड्याने दिला जातो तेव्हा इतरांकडून तिथे शाकाहारी की मांसाहारी जेवण दिले जाते, हे समाज पाहू शकत नाही; पण स्वत: तरी मांसाहारी जेवण द्यायला नको होते, अशी अपेक्षा व्यक्त होताना ऐकू येते.