पान 2- कुजबूज
By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST
खाशांची बिल्डिंग!
पान 2- कुजबूज
खाशांची बिल्डिंग!विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्या मालकीची म्हापशात एक बिल्डिंग असल्याचे खुद्द खाशांनीच विधानसभेत उघड केले. या बिल्डिंगमधील दुकाने भाड्याने दिल्याचे ते म्हणाल्याचे गोव्याच्या कानाकोपर्यातील लोकांनी टीव्ही चॅनेलवरील थेट प्रक्षेपणात पाहिले. विषय होता सबरजिस्ट्रार कार्यालयाची लिफ्ट चालत नसल्याने म्हापशातील या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होतो त्यासंबंधीचा. राणे यांनी एका भाडेकरूला या कार्यालयात तिसर्या मजल्यावर चढून जाताना कसा त्रास झाला याचे विवेचन केले. विरोधी पक्षनेते बारीकसारीक विषय विधानसभेत आणतात म्हणून मुख्यमंत्रीही नाराज आहेत. परवा तर एका शिक्षिकेच्या बदलीचा विषय खाशांनी आणला तेव्हा पार्सेकरांनी त्यांना राज्याचे व्यापक विषय आणा, असेही सुनावले. राणे यांच्याकडील 80 गाई-म्हशींचा विषय दर विधानसभेत येतो. राणे स्वत:च त्याबद्दल सांगतात. म्हापशात त्यांची बिल्डिंगही आहे, हे लोकांना आता समजले.