शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पान १ - काँग्रेस/सपा

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

काँग्रेस-सपाची आघाडी

काँग्रेस-सपाची आघाडी
- ६ जागा देणार: सायकलची पंजाला साथ
मुंंबई - राष्ट्रवादीने साथ सोडली असली तरी मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या रुपाने काँग्रेसला नवा साथी मिळाला आहे. सपाला ६ ते ८ जागा देण्यात येतील, अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपाचे प्रदेशाध्यक्ष आ.अबू आझमी यांच्याशी चर्चा केली. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींची मोट बांधण्याच्या उद्देशानेच सपाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
आ. आझमी म्हणाले, भिवंडी पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, कुर्ला, उद्गीर, औरंगाबाद मध्य यासह आठ जागा आम्हाला आघाडीमध्ये मिळतील, असा माझा विश्वास आहे. सपाला आघाडीत सहा जागा देण्यात येतील, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
सपाला सोबत घेतल्याने विशेषत: त्यांना मानणारा मुस्लिम मतदार काँग्रेससोबत येईल, असा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. प्रा.जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी देखील काँग्रेससोबत आहे.
मात्र, सपासोबत आघाडी करण्याच्या निर्णयास विरोध दर्शवित काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. (विशेष प्रतिनिधी)