पान १ -सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!
By admin | Updated: May 12, 2014 21:54 IST
सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!
पान १ -सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!
सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार विविध वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही आणि या पक्षाला ८ ते १० जागांचा फटका बसेल. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला यावेळी तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त जागा बहुतेकांनी दिलेल्या नाहीत. सीएनएन-आयबीएन आणि टाइम्स नाऊने काँग्रेस-राष्ट्रवादीला इतरांपेक्षा सर्वांत जास्त जागा दिल्या आहेत. गेल्यावेळी ९ जागा जिंकणार्या भाजपला यावेळी सर्वांत जास्त फायदा होताना दिसतो. ११ जागा जिंकणारी शिवसेनाही यावेळी फायद्यात दिसते. मनसे एका जागेसह खाते उघडेल, असे एनडीटीव्हीने वर्तविले आहे. आम आदमी पार्टीला केवळ एबीपी-नेल्सनने एक जागा दिली आहे. बहुजन समाज पार्टीचे खाते उघडताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजप-शिवसेना महायुतीची मतांची टक्केवारी निश्चितच वाढलेली असेल, असे प्रत्येक एक्झिट पोलमध्ये दिसते. (विशेष प्रतिनिधी)-----------------------------------------------------एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा महायुतीला मिळतील. आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू. केंद्र आणि राज्य सरकारच्या कुशासनाविरुद्ध कौल देतानाच राज्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर एकमुखाने विश्वास व्यक्त केल्याचे १६ तारखेला स्पष्ट होईल. - देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़एक्झिट पोलची आकडेवारी आम्हाला मान्य नाही. १६ तारखेचा निकाल वस्तुस्थिती सांगेलच. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा यावेळी आम्ही फार मागे राहणार नाही. - माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस. ----------------------------------------------------------स्रोत काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आप इतर सी-व्होटर ०९ ०५ १७ १४ सीएनएन-आयबीएन आघाडी - १६ ते २२ महायुती - २३ ते २९टाइम्स नाऊ आघाडी - २१ महायुती - २७एबीपी-नेल्सन ०९ ०६ २१ ११ ०१एनडीटीव्ही आघाडी - १० महायुती - ३६ ०१ ०१आजतक / इंडिया टुडे आघाडी - ११ ते १५ महायुती - २७ ते ३५ २ ते ६----------------------------------------------------------------------------------------