शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचे दुसरे नाव पाकिस्तान: काँग्रेस

By admin | Updated: September 23, 2016 01:35 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे.

शीलेश शर्मा,नवी दिल्लीपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात ज्या प्रकारे अतिरेक्यांचे उदात्तीकरण केले, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादाला मदत करणे, हे पाकिस्तान सरकारचे धोरण आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने जगातील देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा ओळखावा. कारण पाकिस्तान हा फ्रान्स, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियमसह जगभरातील अतिरेक्यांना आश्रय देत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आपण सरकारसोबत असल्याचे दाखवून देत, काँग्रेसने स्पष्ट केले की, राष्ट्रहिताच्या प्रत्येक निर्णयाबाबत आपण सरकारसोबत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणीही काँग्रेसने केली, जेणेकरून संपूर्ण देश एका सुरात उभा असल्याचे दिसून येईल. पाकिस्तानबाबत काँग्रेसची भूमिका सरकारपेक्षाही अधिक आक्रमक आहे, असे या वक्तव्यांवरून दिसून येते. पाकिस्तान हा देश पूर्णपणे आयएसआय आणि सैन्याच्या इशाऱ्यावर चालत असल्याचेही काँगे्रसने म्हटले आहे. त्यामुळेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनला आहे. येथे अतिरेक्यांचे पोषण केले जात आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आता संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत मजबूतपणे आपली बाजू मांडू शकेल. तर जगालाही कळून चुकेल की, कशा प्रकारे पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नवाज शरीफ यांना हे माहीत नाही काय की, मौलाना मसूद अजहर, दाउद, हाफिज सईद यांच्यासारखे कुख्यात अतिरेकी हे पाकिस्तानातील आयएसआयच्या इशाऱ्यावरून जगभरात दहशतवाद पसरवित आहेत. लादेन पाकिस्तानात अबोटाबादमध्ये सैन्याच्या मुख्यालयाजवळच सापडला होता, हे जग विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले. बुऱ्हान वाणी याचे शरीफ यांनी ज्या प्रकारे उदात्तीकरण केले, त्यावरून पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यात काय नाते आहे, हे सांगण्याची गरजच नाही.