शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या ७ रेंजर्ससह एका दहशतवादयाचा खात्मा

By admin | Updated: October 21, 2016 21:08 IST

सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारतीय जवांनी पाक रेंजर्सचे ७ जवानासह एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू, दि. २१ : पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी निमलष्करी दलाने कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांनाही लक्ष्य केले. छोट्या शस्त्रांद्वारे मारा करण्यात आला. सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारतीय जवांनी पाक रेंजर्सचे ७ जवानासह एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. पाकच्या आगळिकीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गुरुवारी याच भागात ६ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता.

पाकिस्तानी सैन्याने रात्री राजौरी जिल्ह्यात ताबा रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. सीमेपलीकडून होत असलेल्या माऱ्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असून चकमक सुरू आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला. पाकिस्तानी निमलष्करी दलाने कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांनाही लक्ष्य केले. छोट्या शस्त्रांद्वारे मारा करण्यात आला. सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर उभय पक्षांत १५ मिनिटे चकमक झडली. यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला.

या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या ४ दिवसांपासून चकमकी झडत आहेत. पाकने गेल्या ४ दिवसांत ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी सीमेपलीकडून भीमबर गली भागात तोफगोळ्यांचा मोठ्या प्रमाणात मारा झाला होता.