शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे २० सैनिक ठार

By admin | Updated: October 30, 2016 06:31 IST

भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला

श्रीनगर : भारतीय लष्कराने शनिवारी जोरदार हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाककडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. भारताच्या या आक्रमक कारवाईत पाकचे किमान २० सैनिक ठार झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.भारतीय लष्कराच्या हल्ल्यात पाकच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून, मोठी जीवितहानी घडवून आणण्यात आली आहे, असे लष्कराच्या नार्दर्न कमांडने ट्विटरवर म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात भारतीय जवान नितीन सुभाष कोळी आणि मनदीपसिंह शहीद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आक्रमक कारवाई करून हिशेब चुकता केला. पाकने मनदीप याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर बीएसएफचे महानिरीक्षक अरुण कुमार यांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सरकार आणि सुरक्षा दले भारतीयांची मान खाली जाऊ देणार नाहीत, असे सांगून जोरदार कारवाईचे संकेत दिले होते. भारताने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाक सैनिकांची संख्या दोन आकडी असू शकते, असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या २९ सप्टेंबरच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राईक) उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल

स्ट्राईकनंतर पाकने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे २० हून अधिक लोक ठार झाले आहेत. भारतीय सैन्यदलाने गुरुवारी १५ पाकिस्तान रेंजर्सचा खात्मा केला होता. पाकने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या केरन भागात केलेल्या गोळीबारात एक जवान आणि एक महिला, असे दोन जण जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या बंदुका पाकवर तुटून पडल्या. (वृत्तसंस्था)