शसंधीचे सर्वात मोठे उल्लंघन : दोन नागरिक ठार, हजारो नागरिकांचे स्थलांतर, भारताचे चोख प्रत्युत्तर
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी मध्यरात्री अचानक जम्मू विभागामधील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 22 भारतीय चौक्यांसह 13 गावांमध्ये गोळीबार करीत हल्ला चढविला. यात दोन भारतीय नागरिक ठार तर सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) सहा जवान व दोन नागरिक जखमी झाले. 2क्क्3मध्ये शसंधी झाल्यानंतर जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांकडून करण्यात आलेले हे शसंधीचे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे सांगितले जाते.
पूंछच्या हमीरपूर उपविभागात व आर.एस. पुरा व अरनियाच्या सीमेला आपले लक्ष्य बनवीत पाकने हा हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर तत्काळ पावले उचलीत येथील सीमेलगतच्या गावांतील 3क्क्क्हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. बीएसएफच्या वरिष्ठ अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या जवानांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. सकाळी 7 वाजेर्पयत दोन्ही देशांत गोळीबार सुरू होता. पाक सैनिकांनी जम्मूच्या अरनिया व आर.एस. पुरा उपविभागात रात्री 12.3क्पासून 82 तोफगोळे डागले व स्वयंचलित रायफल्समधून 22 चौक्या व 13 गावांना आपले लक्ष्य बनविले.
आर.एस. पुरा भागात आदळलेल्या एका तोफगोळ्यामुळे एक घर जमीनदोस्त होऊन त्यात अकरम हुसैन व त्यांचा मुलगा जागीच ठार झाले. या घटनेत त्यांच्या कुटुंबातील तिघे जण जखमी झाले
आहेत. (वृत्तसंस्था)
प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर - अरुण जेटली
विशाखापट्टणम्- पाककडून होत असलेल्या शसंधीच्या उल्लंघनाला व हल्ल्याला भारतीय जवान चोख उत्तर देत असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी येथे म्हटले आहे.
पाककडून वारंवार शसंधीचे उल्लंघन होत असल्याचे मान्य करून जवानांनी या हल्ल्यांना नेहमीच चोख उत्तर दिले असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले.
जवानांनी प्रत्येक हल्ल्याला असे चोख उत्तर दिले असून, देशाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असे आवाहनही जेटली यांनी या वेळी केले.
महिनाभरात 22 वेळेस उल्लंघन
या गावांमध्ये ट्रेवा, निकोवाल, पिंडी, गढी, घराना, कोरोटना खुर्द, विधीपूर आदी गावांचा समावेश आहे. या हल्ल्यात पाच घरे जमीनदोस्त झाली.
बोगदा आढळला
जम्मू जिल्ह्याच्या पल्लनवाला सेक्टरमधील चालका चौकीत नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मिरातून येणारा एक बोगदा आढळून आला असून, तो दिसल्यानंतर हा गोळीबार सुरू झाल्याचे अधिका:यांनी सांगितले.