शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांचं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: June 3, 2017 08:10 IST

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नावच घेत नाहीत. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 3 - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नावच घेत नाहीत. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केला. दरम्यान आताही गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 
 
दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुरुवारी (31 मे) पाकिस्तानचे पाच सैनिक ठार, तर सहा जखमी झाले होते. तत्पूर्वी पहाटे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात गोळीबार केला होता. भारतीय सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांनाही गुरुवारी ठार मारले. ते दोघे स्थानिक होते.
 
रावत यांनी घेतला आढावा
काश्मीर आणि नियंत्रण रेषेवर तैनात सुरक्षा दलांची सज्जता आणि एकूण सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपीन रावत गुरुवारी येथे दाखल झाले होते. खोऱ्यातील सुरक्षा स्थिती आणि लष्करी सज्जतेचा आढावा घेणे हा रावत यांच्या दौऱ्याचा उद्देश होता.
 
हिजबुलचा कमांडर सबझार भट मारला गेल्यानंतर काश्मिरात तणाव कायम आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आली.