शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: September 7, 2016 04:41 IST

पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात मंगळवारी उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

जम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात मंगळवारी उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मध्यरात्री कोणत्याही चिथावणीविना नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्करी चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, असे लष्करी प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले. पाकिस्तानी लष्कराने पूंछ क्षेत्रात उखळी तोफांचा मारा करण्यासह छोटी शस्त्रे आणि स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. आमच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराची कोणतीही हानी झाली नव्हती. नियंत्रण रेषेवर अजूनही गोळीबार सुरू आहे, असे हा प्रवक्ता म्हणाला. शाहपूर कंदी भागात मधूनमधून गोळीबार होत आहे. आठवडाभरात शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही दुसरी वेळ आहे. २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी लष्कराने जम्मू जिल्ह्याच्या अखनूर क्षेत्रात गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. याच्या आधी १४ आॅगस्ट २०१६ रोजी पाक लष्कराने दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले होते. (वृत्तसंस्था)भारतीय राजदूतांचा पाकला सल्लाइस्लामाबाद : काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तानने इतर देशांच्या प्रश्नांत नाक खुपसण्याआधी स्वत:च्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला भारताचे पाकिस्तानातील राजदूत गौतम बंबावाले यांनी पाकला दिला. काचेच्या घरांत राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, असेही ते म्हणाले. काश्मीर मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानबाबत अलीकडेच केलेल्या विधानांवरील प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये समस्या आहेत. इतर देशांच्या समस्यांत लक्ष घालण्यापूर्वी तुम्ही (पाकिस्तान) तुमच्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.