देश-परदेश- पाकिस्तान स्फोट (सुधारित)
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
पाकिस्तानात आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात ६१ ठार
देश-परदेश- पाकिस्तान स्फोट (सुधारित)
पाकिस्तानात आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात ६१ ठारकराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका धार्मिकस्थळी झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्यात ६१ जण ठार, तर अन्य ५५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असून जखमींपैकी अनेकांची स्थिती चिंताजनक आहे. अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण हल्ला आहे.शुक्रवारी प्रार्थनेसाठी लोक जमलेले असताना शिकारपूर जिल्ातील लाखी दर येथील धार्मिकस्थळी हा स्फोट झाला. या भीषण स्फोटाने या इमारतीचे छप्पर कोसळून ढिगार्याखाली अनेक जण अडकले. जुंदुल्ला दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने गेल्यावर्षी तालिबानशी संबंध तोडून इसिसशी नाते जोडले आहे. आमचे लक्ष्य शिया होते, कारण ते आमचे शत्रू आहेत, असे या संघटनेचा प्रवक्ता फहद मार्वत याने म्हटले आहे.पंतप्रधान नवाज शरीफ हे कराची भेटीवर असतानाच हा हल्ला झाला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध करून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. शिकारपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक साकीब इस्माईल यांनी सांगितले, प्राथमिक तपासानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले आहे. स्फोट भयानक होता. त्यामुळे या इमारतीचे छत कोसळले. ढिगार्याखाली अडकल्याने अनेक जण गुदमरुन ठार झाले.हा स्फोट झाला तेव्हा या ठिकाणी ४०० पेक्षा अधिक भाविक होते. स्फोटाची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी फरहान खान यांनी सांगितले.एका व्यक्तीने सोबत स्फोटक उपकरण आणले होते. त्यानेच हा स्फोट केला, असे शिकारपूरचे पोलिस उप महानिरीक्षक रखिओ मिराणी यांनी सांगितल्याचे वृत्त जिओ टीव्हीने दिले.जखमींना कार, मोटारसायकली आणि रिक्षातून इस्पितळात नेण्यासाठी लोक धावपळ करीत होते. घटनास्थळावरून दृश्य थरकाप उडविणारे होते.