जम्मू : पाक सैनिकांनी मध्यरात्री जम्मू सेक्टरमधील भारताच्या दोन ठाण्यांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी तात्काळ उत्तर दिले. पाकच्या सैनिकांनी गेल्या 12 दिवसात 14 वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.बीएसएफच्या एका अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजरनी रात्री 1 च्या सुमारास भारताच्या दोन ठाण्यांवर कुठलीही सूचना न देता गोळीबार सुरू केला.