पान 7 : गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचा उद्या वर्धापनदिन
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
मडगाव : गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचा वर्धापनदिन सोहळा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता फोंडा येथील सनग्रेस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पान 7 : गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचा उद्या वर्धापनदिन
मडगाव : गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचा वर्धापनदिन सोहळा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता फोंडा येथील सनग्रेस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात धनगर समाजाची एकजूट, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांचे अभिनंदन, समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी, तसेच धनगर समाजाचा आवाज बुलंद करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राज्य कार्यकारिणी समिती, गोमंतक समाजोन्नती मंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)