पान 7 : बस्तोडा उपसरपंचपदी रणजीत उसगावकर
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
म्हापसा : बस्तोडा पंचायतीच्या उपसरपंचपदी रणजीत उसगावकर यांची निवड करण्यात आली. उपसरपंचांची निवड करण्यासाठी पंचायतीची खास बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती.
पान 7 : बस्तोडा उपसरपंचपदी रणजीत उसगावकर
म्हापसा : बस्तोडा पंचायतीच्या उपसरपंचपदी रणजीत उसगावकर यांची निवड करण्यात आली. उपसरपंचांची निवड करण्यासाठी पंचायतीची खास बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. उपसरपंच अमित सोयरो यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागील महिन्यात मंजूर झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. या पंचायतीवर सात पंचसदस्य आहेत. या बैठकीला सरपंच प्रतीक्षा मयेकर, सावियो मार्टिन्स, राखी नारोजी, रीमा मोरजकर आणि रणजीत उसगावकर उपस्थित होते. अमित सोयरो आणि रॉक मोनीज हे पंचसदस्य बैठकीला अनुपस्थित होते. या वेळी सावियो मार्टिन्स यांनी त्यांचे नाव सुचवले, तर रीमा मोरजकर यांनी अनुमोदन दिले. निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयातील अधिकारी साईश परब उपस्थित होते. सचिव स्मिता परब यांनी त्यांना सहकार्य केले. फोटो : बस्तोडा उपसरपंच रणजीत उसगावकर (2808-एमएपी-11)