पान 5 : कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी
By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST
पणजी : युवा पिढीला कृषिविषयक अभ्यासक्रमात कारकीर्द घडविण्याची संधी देणार्या केपे तालुक्यातील सुळकर्णे येथील कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कृषी शिक्षण देणारे गोव्यातील हे पहिले कृषी महाविद्यालय आहे.
पान 5 : कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी
पणजी : युवा पिढीला कृषिविषयक अभ्यासक्रमात कारकीर्द घडविण्याची संधी देणार्या केपे तालुक्यातील सुळकर्णे येथील कृषी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कृषी शिक्षण देणारे गोव्यातील हे पहिले कृषी महाविद्यालय आहे.सध्याच्या आधुनिक युगात युवा पिढी पारंपरिक व्यवसायांपासून दुरावत चालली आहे. शेती व्यवसायाकडून दुरावत चाललेल्या युवकांनी शेतीकडे पुन्हा वळावे आणि गोव्याला कृषिप्रधान राज्य बनविण्याच्या उद्देशाने या कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोग व ग्रामीण शेतकर्यांच्या संपर्कात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जातो. कृषितज्ज्ञ मिंगेल ब्रागांझा म्हणाले की शेती, फलोत्पादन, फळबाग, पशुसंवर्धन आदीविषयक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आहे. कृषी खात्यासाठी कर्मचारीवर्ग पुरविण्याच्या विचाराने या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली नाही. भविष्यात विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात उत्तम प्रकारे तयार करण्यासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शेती करण्याची यंत्रे उपलब्ध करण्यात आली असून ऊस, केळी, काजू, माड अशा वृक्षांचे रोपण करण्यात येते. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या अभ्यासक्रमाला गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. विद्यार्थ्यांना अँग्रोनॉमी, वनस्पतीशास्त्र, पॅथॉलॉजी, फलोत्पादन आदी विषय शिकविण्यात येतात. महाविद्यालयाच्या सल्लागार समितीवर कृषी संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 200 एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शेतीविषयक प्रयोग करण्याची संधी मिळते. भविष्यात या महाविद्यालयात मास्टर डिग्री आणि पीएचडी तसेच अनेक दीर्घकालीन आणि शॉर्टटर्म अभ्यासक्रम सुरूकरण्यात येतील. तसेच शेतीची उपकरणे शेतकर्यांसाठी अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करण्याचा महाविद्यालयाचा विचार आहे. कोट‘‘अशा उपक्रमांमुळे जे शेतकरी आपल्या जमिनी विकतात त्यांना शेतीचे महत्त्व पटवून देता येईल. पारंपरिक शेतीच्या अनेक पध्दती आहेत. जमिनीत विविध प्रकारची धान्ये पेरणे, ग्रीन हाऊस अशा विविध शेतीविषयक माहितीचे ज्ञान विद्यार्थ्यांमार्फत पारंपरिक शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. - फा. इयान फिगरेदो, मुख्य धर्मगुरु, डॉन बॉस्को (प्रतिनिधी) बॉक्स- प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतामहाविद्यालयात प्रवेशासाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा विषयांत बारावीत कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तसेच फलोत्पादन, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयात व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमासाठी 40 जागा उपलब्ध असून 20 जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी तर 20 जागा भारतातील विद्यार्थ्यांंसाठी ठेवण्यात आल्या आहेत.