पान 4 : वेश्या व्यवसायातील दोन युवतींची सुटका दोघांना अटक
By admin | Updated: August 3, 2015 22:31 IST
बार्देस : माकरूसवाडा-कांदोळी येथे सोमवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कळंगुट पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन युवतींची सुटका केली. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित (बंगळुरू) व आसिफ (दिल्ली) हे युवक दीपक शामलाल सरकार (31, ठाणे-मुंबई) व आनंद रामा गौडा (28, बंगळुरू) यांच्या मदतीने युवतींना आणून वेश्या व्यवसाय करण्यास त्यांना भाग पाडत होते. याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी रविवारी रात्री 10 ते सोमवारी रात्री 2 वाजेपर्यंत दोन युवतींची सुटका केली व मेरशी येथील अपना घरात रवानगी केली. या प्रकरणी पोलिसांनी दीपक सरकार व आनंद गौडा या दोघांना अटक केली असून इतर दोघांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)