पान ४- विजेच्या धक्क्याने दोघे गंभीर जखमी
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST
वास्को : एका वीज खांबाचे काम करताना विजेचा धक्का बसून दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले; पण दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावले.
पान ४- विजेच्या धक्क्याने दोघे गंभीर जखमी
वास्को : एका वीज खांबाचे काम करताना विजेचा धक्का बसून दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले; पण दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावले. दि. २० रोजी सकाळी १० वाजता बायणा कामत गॅरेज समोरील वळणावर मुख्य रस्त्याच्या कडेला एमपीटी आस्थापनाच्या संरक्षक भिंतीशेजारी असलेल्या एका १ केव्हीच्या वीज खांबावर वीज खात्याचे कर्मचारी काम करण्यासाठी आले होते. ॲल्युमिनियम सीडीचा वापर करून त्यातील लाइनमन प्रसन्ना नारायण मेस्ता हे खांबावर चढले होते, तर त्यांचे मदतनीस लाइनमन समीर नाईक खाली सिडीला धरून उभे राहिले होते. अचानक खांबावर चढलेले प्रसन्ना मेस्ता यांना विजेचा धक्का बसल्याने ते खाली फेकले गेले व खाली असलेल्या समीर नाईक यांना सिडी पकडल्यामुळे विजेचा तीव्र झटका बसल्याने ते तेथेच कोसळले. यात प्रसन्ना व समीर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तेथून अश्रफ शेख या इसमाने त्वरित आपल्या वाहनाने जवळच असलेल्या खासगी इस्पितळात नेले. नंतर त्यांच्या अधिकार्यांनी त्यांना चिखली येथील सरकारी कुटिररुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)े