पान ४- चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST
हरमल : येथील तिठा भागातील मोबाईल शॉपी दुकान फोडून चोरट्यांनी लाख रुपयांचा माल लंपास केल्याने व्यावसायिकांत भीती निर्माण झाली आहे.
पान ४- चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले
हरमल : येथील तिठा भागातील मोबाईल शॉपी दुकान फोडून चोरट्यांनी लाख रुपयांचा माल लंपास केल्याने व्यावसायिकांत भीती निर्माण झाली आहे.दि. १९ रोजी रात्री २ वा.च्या सुमारास ही घटना घडली. तिठा येथील अरुण गावडे यांच्या दुकानाचा पुढील दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच कपाटातील किंमती हेडफोन्स, मोबाईल, सीडीज, कार्ड्स आदी मिळून लाखभराचा ऐवज लंपास केला. गावडे यांनी रात्री घरी जाताना अधिकाधिक मोबाईल सेट्स व कार्ड्स घरी घेऊन गेले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी याच दुकानाची कौले काढून चोरट्यांनी डल्ला मारला होता. हरमल आउट पोस्ट हवालदाराने पंचनामा केला. (प्रतिनिधी)