पान 4- डिचोलीत टाऊन सेंटर इमारतीवरून पडून युवती जखमी
By admin | Updated: October 3, 2015 02:30 IST
डिचोली : डिचोली टाऊन सेंटर इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने डिचोलीत खळबळ माजली असून सुदैवाने युवतीचा जीव वाचला असून तिच्यावर उपचार चालू आहेत.
पान 4- डिचोलीत टाऊन सेंटर इमारतीवरून पडून युवती जखमी
डिचोली : डिचोली टाऊन सेंटर इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने डिचोलीत खळबळ माजली असून सुदैवाने युवतीचा जीव वाचला असून तिच्यावर उपचार चालू आहेत.डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या युवतीचे नाव गंधाली (ममता) मनोहर च्यारी (25) असून ती शिंगणे सत्तरी येथील आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.उडी घेतलेल्या युवतीला पहाताच कुणी तरी 108 ला कळवले. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल जाले. युवतीला आरोग्य केंद्रात व नंतर उपचारासाठी आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.सदर इमारतीत एकही सुरक्षारक्षक नसून येथे सरकारी कार्यालये आहेत. रात्री गेट उघडे असल्याने रात्री काय घडते याकडे कुणाचेच लक्ष नसते.या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले असून युवतीने उडी घेतली की तिला कुणी तरी ढकलले याचा उलगडा होणे कठीण आहे. याबाबत युवतीने काहीच माहिती दिली नाही.उपअधीक्षक रमेश गावकर, निनाद देऊलकर यांनी इमारतीची पाहणी करून शोधाशोधही केली. याप्रकरणी पोलीस तपीस जारी आहे. (प्रतिनिधी)