शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

पान ४ सिमेंटवाहू ट्रक कलंडल्याने दोघे ठार

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

धारबांदोड्यातील घटना

धारबांदोड्यातील घटना
फोंडा : धारबांदोडाजवळील एका धोकादायक वळणावर हैदराबादहून पणसुले-तिस्क येथे प्रिया सिमेंट घेऊन येणारा ट्रक कलंडला. या अपघातात ट्रकचालक तसेच पर्यायी चालक जागीच ठार झाले. घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जी. प्रवीणकुमार (३७) आणि बी. श्रीनिवास (४८) अशी मृतांची नावे असून दोघेही हैदराबाद येथील आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायं. ४ च्या सुमारास एपी-२४-टीसी-४८८६ क्रमांकाचा सिमेंटवाहू ट्रक हैदराबाद येथून ६८0 सिमेंटच्या गोणी घेऊन पणसुले, तिस्क, उसगाव येथे निघाला होता. सुकतळी-मोले येथील पेट्रोलपंपवर ट्रकमध्ये डिझेल भरल्यानंतर ट्रकचालकाने अवघ्या काही वेळेत तिस्क येथील गोदामात पोहोचत असल्याचे मोबाईलवरून कळवले होते. मात्र, तिस्क उसगाव येथून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर भरधाव वेगातील ट्रक अपघातग्रस्त झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की संपूर्ण ट्रक रस्त्यात कलंडला तसेच झाडाला धडक बसल्याने ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. तसेच ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्ताभर विखुरल्या. अपघातात दोन्ही चालकांच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे या वेळी स्थानिकांनी सांगितले.
अपघाताचे वृत्त मिळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील तसेच वाहतूक निरीक्षक नीलेश धायगोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.
दरम्यान, अपघातानंतर या भागातील वाहतूक चौपदरी रस्त्याचे काम सुरू असलेल्या बगलरस्त्याने वळवण्यात आली. दरम्यान, या भागात अनेक अपघात होऊनही इथल्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच अन्य समस्यांबाबत सरकार कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
-----
सुदैवाने पत्रकार बचावला
पणसुले-तिस्क येथे झालेल्या अपघातात कुळे येथील उमेश नाईक हा पत्रकार सुदैवानेच बचावला. हा अपघात होण्याच्या तासभरापूर्वी याच भागात आणखी एक अपघात घडला होता. या अपघाताचे वार्तांकन करून नाईक हे दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून फोनवरून मित्राशी संवाद साधत होते. या वेळी सिमेंटवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली व तेथेच कलंडला. यात नाईक यांची जीए-0९-जे-३६३२ क्रमांकाची दुचाकी सिमेंटच्या पोत्यांखाली गाडली गेली. नशीब बलवत्तर असल्यानेच नाईक हे बचावल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
ढँङ्म३ङ्म : 2404-स्रङ्मल्ल-03
कॅप्शन - धारबांदोडा येथे रस्त्यात कलंडलेला सिमेंटवाहू ट्रक. शेजारीच पत्रकार उमेश नाईक यांची दुचाकी. (छाया- शेखर नाईक)