पान ३ : भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन, गुन्हा नोंद
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
मडगाव : भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन करून सेर्नाभाटी येथे रस्ता बांधण्यासाठी अज्ञाताने मातीचा थर आणून टाकला असून, यासंबंधी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यटन खात्याचे गोवा किनारपी विभाग प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.
पान ३ : भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन, गुन्हा नोंद
मडगाव : भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन करून सेर्नाभाटी येथे रस्ता बांधण्यासाठी अज्ञाताने मातीचा थर आणून टाकला असून, यासंबंधी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यटन खात्याचे गोवा किनारपी विभाग प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत.१५व १६ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. सेर्नाभाटी समुद्रकिनार्याजवळील भरतीरेषेपासून काही अंतरावर हे मातीचे ढीग टाकले असून, रस्ता बांधणीसाठी हे काम अज्ञाताने केले असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. संशयिताचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. पुढील तपास चालू आहे. (प्रतिनिधी)