पान 2 - साक्षीदार बनण्यास तयार : मोहंती
By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST
(सत्यकामचा फोटो घेऊन आतल्या पानाला बातमी द्यावी)
पान 2 - साक्षीदार बनण्यास तयार : मोहंती
(सत्यकामचा फोटो घेऊन आतल्या पानाला बातमी द्यावी)पणजी : लाचखोरी प्रकरणाचा मी साक्षिदार बनण्यास तयार होतो, अशी माहिती या प्रकरणात अटक करण्यात आलेला जैकाचा लुईस बर्जर कंपनीचा माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती याने न्यायालयात त्याच्या जामिनावरील सुनावणीच्यावेळी दिली. आता मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान सत्यकाम मोहंती याच्यातर्फे त्याच्या वकिलाने न्यायालयात दिलेली माहिती :- लाच प्रकरणात मी लाच दिलीही नाही आणि घेतलीही नाही.- या प्रकरणात माझी केवळ बघ्याची भूमिका राहिली. - कंपनीत मला काहीच अधिकार नव्हते, माझे हात-पाय बांधले होते.- कंपनीतील कारभाराला कंटाळून ऑक्टोबर 2010 मध्ये राजीनामा दिला, तो 2012 मध्ये स्वीकारण्यात आला.- क्राईम ब्रँचने मला अटक करण्याऐवजी माजी मदत घेऊन तपास काम गेले असते तर सत्याच्या मुळाशी पोहोचले असते.- या प्रकरणाशी संबंध असलेले सर्वांनाच संशयित करू नये.