पान २ - मिकीची सभागृहातील उपस्थिती न्यायालयावर अवलंबून
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST
पणजी : आमदार मिकी पाशेको यांची विधानसभेतील हजेरी ही न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. त्यामुळे पाशेको यांच्या विधानसभेतील उपस्थितीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पान २ - मिकीची सभागृहातील उपस्थिती न्यायालयावर अवलंबून
पणजी : आमदार मिकी पाशेको यांची विधानसभेतील हजेरी ही न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. त्यामुळे पाशेको यांच्या विधानसभेतील उपस्थितीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाशेको हे विधानसभा अधिवेशनात सभागृहात उपस्थित असतील की नाही, याबद्दल अद्याप काहीच ठरलेले नाही. याविषयी सभापती आर्लेकर यांनी सांगितले की, पाशेको हे तुरुंगात गेले आहेत ते न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ते बाहेर येणेही न्यायालयाच्या आदेशावरच अवलंबून आहे. न्यायालयाने परवानगी दिली तर ते सभागृहात उपस्थित असतील आणि परवानगी नाकारली तर ते उपस्थित राहू शकणार नाहीत. पाशेको यांनी विधानसभेत या वेळी ७८ प्रश्न दिले आहेत. अजूनही दोन दिवसांचा अवधी असल्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशनात उपस्थिती लावण्यासाठी पाशेको यांनी न्यायालयाला अर्ज करणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत तरी त्यांनी तसा अर्ज केला नव्हता. त्यामुळे पाशेको हे सभागृहात येण्यासाठी स्वत: इच्छुक आहेत की नाहीत याबद्दलही काही सांगता येत नाही. (प्रतिनिधी)