पान 2 - सुरक्षा रक्षकांबाबत सरकारचा खेळ अजूनही नोकरी नाही (((शंका)))
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
सुरक्षा रक्षकांबाबत सरकारचा खेळ
पान 2 - सुरक्षा रक्षकांबाबत सरकारचा खेळ अजूनही नोकरी नाही (((शंका)))
सुरक्षा रक्षकांबाबत सरकारचा खेळअजूनही नोकरी नाहीपणजी : मानव संसाधन विकास महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची छळवणूक करण्यात येत आहे. सरकारने दोन महिन्यांच्या आत सुरक्षा रक्षकांना नोकरीवर भरती करून घेतो, असे आश्वासन दिले असले तरी गेले 5 महिने 145 सुरक्षा रक्षकांना अजूनही नोकरीवर घेण्यात आले नाही. काही सुरक्षा रक्षकांना सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. सुरक्षा रक्षकांना नोकरीवर घेण्याची आश्वासने 2012 सालच्या निवडणुकांपूर्वी भाजपा सरकारनेच दिली होती. सत्तेवर आल्यानंतर अल्प वेतनात त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले. मात्र, काही महिन्यांचा कंत्राट संपल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकले. त्या जागी नवीन कामगारांना भरती करून घेतले गेले. मात्र, पूर्वीच्या 400 कामगारांना कामावर घेण्यास भाजपा सरकार टाळाटाळ करू लागले. गेल्या चतुर्थीवेळी, डिसेंबर महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या तीव्र आंदोलनाला घाबरून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोन महिन्यांत सुरक्षा रक्षकांना कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही 145 उमेदवार नोकरीविना असल्याचे केरकर म्हणाल्या.राहिलेल्या उमेदवारांत काही उमेदवारांचे वय 40-45 पेक्षा जास्त आहे. सुपयवायझर पदाचे 8 उमेदवार आहेत. पुरुष सुरक्षा रक्षक 45, महिला सुरक्षा रक्षक 30 तर हाउसकिपिंग पदावरील 22 उमेदवार आहेत. उमेदवारांच्या नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी मानव संसाधन महामंडळात गेल्यास तेथील सरव्यवस्थापक ए.डी. फळ यांच्याकडून सुरक्षा रक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. उमेदवारांनी आपली माफी मागावी, अशी मागणी फळ करतात. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कामगार नेत्या म्हणून केरकर म्हणाल्या की, सुरक्षा रक्षकांची फसवणूक सरकार आणि महामंडळाने केली आहे. (((((तुम्ही मुख्यमंत्र्यांनी मागणी मागावी असे पत्र करा.))))) सरकारने 145 उमेदवारांना नोकरीवर घेण्यास टाळाटाळ केल्यास आम्हाला पुन्हा आंदोलन छेडावे लागेल. सुरक्षा रक्षकांना नोकरी देण्यासाठी मध्यस्थी करणार्या आमदारांनीही आता माघार घेतली आहे.जोपर्यंत 145 उमेदवारांना नोकरीवर रुजू करून घेतले जाणार नाही, तोपर्यंत कामगार नेते त्यांच्या पाठिशी उभे राहतील. तसेच आवश्यकता पडल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा केरकर यांनी दिला. (प्रतिनिधी)