पान 2 : गोव्याला स्वतंत्र उच्च न्यायालयाची गरज नाही : मोहित शहा
By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST
मडगाव : गोव्याला स्वतंत्र उच्च न्यायालयाची गरज नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सांगितले. मडगावात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या विषयावर पत्रकारांनी त्यांचे मत जाणून घेतले.
पान 2 : गोव्याला स्वतंत्र उच्च न्यायालयाची गरज नाही : मोहित शहा
मडगाव : गोव्याला स्वतंत्र उच्च न्यायालयाची गरज नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सांगितले. मडगावात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या विषयावर पत्रकारांनी त्यांचे मत जाणून घेतले.गोव्याला स्वतंत्र उच्च न्यायालय हवे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. दक्षिण गोवा वकील संघटना सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत आहे. पत्रकारांनी शहा यांना या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालयाबद्दल विचारले असता, त्यांनी तशी गरज नसल्याचे सांगितले. गोव्यात पाच हजारपेक्षा जास्त खटले नाहीत. त्यामुळे येथे स्वतंत्र उच्च न्यायालयाची निकड नसल्याचे ते म्हणाले.मुंबई उच्च न्यायालयात मुंबईसह अहमदाबाद व अन्य भागातील निष्णात व ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालय झाल्यास या न्यायाधीशांच्या सेवेला गोव्याला मुकावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला लोकायुक्तपदाची ऑफर आली नाही, तसेच गोव्यात स्थायिक होण्याचाही सध्या विचार नाही. जर लोकायुक्तपदाबाबत प्रस्ताव आला तर मागाहून विचार करू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)ढँ3 : 2208-टअफ-05कॅप्शन: मोहित शहा