पान 2 : कॅसिनो महसुलातही घोटाळा
By admin | Updated: August 2, 2015 23:31 IST
सिंगल कॉलम..पान 2..हाप पेजच्या खाली..जनरेशन नेक्स्टचा दावापणजी : ऑफ शोर कॅसिनोत जाणार्या गिर्हायिकांकडून मिळणार्या प्रवेश कराद्वारे सरकारला वर्षाकाठी 120 कोटी रुपये मिळत असले तरी ते प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपये मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हा फार मोठा घोटाळा असल्याचा आरोप जनरेशन नेक्स्ट या बिगर सरकारी संघटनेने केला आहे. संघटनेचे ...
पान 2 : कॅसिनो महसुलातही घोटाळा
सिंगल कॉलम..पान 2..हाप पेजच्या खाली..जनरेशन नेक्स्टचा दावापणजी : ऑफ शोर कॅसिनोत जाणार्या गिर्हायिकांकडून मिळणार्या प्रवेश कराद्वारे सरकारला वर्षाकाठी 120 कोटी रुपये मिळत असले तरी ते प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपये मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हा फार मोठा घोटाळा असल्याचा आरोप जनरेशन नेक्स्ट या बिगर सरकारी संघटनेने केला आहे. संघटनेचे नेते दुर्गादास कामत यांनी सांगितले की ऑफ शोर कॅसिनोंवर दर तासाला 100 ते 150 लोक जात असतात. परंतु कॅसिनोंकडून वाणिज्य कर खात्याला दिलेले शुल्क पाहता कॅसिनोंत जाणार्यांची संख्या कमी दाखविली जात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कामत यांनी केला. वाणीज्य कर खात्याचे कॅसिंनोंवर लक्ष नाही. कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यास या खात्याला अपयश आले आहे असा आरोप त्यांनी केला. नेमके किती लोक कॅसिनोत जातात आणि कॅसिनोंकडून दिलेली आकडेवारीची शहनिशा करण्याची यंत्रणे या खात्याकडे नाहीत. त्यामुळे राज्याला मोठय़ा प्रमाणावर महसूल तूट सोसावी लागत आहे असे त्यांनी सांगितले.