पान १- सपाप्रमुख मुलायमसिंह यांना स्वाईन फ्लृ
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
रुग्णालयात दाखल
पान १- सपाप्रमुख मुलायमसिंह यांना स्वाईन फ्लृ
रुग्णालयात दाखलगुडगाव /लखनौ : समाजवादी पार्टीचे(सपा)प्रमुख मुलायमसिंग यादव यांना शनिवारी गुडगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याची प्राथमिक लक्षणे अहेत. ७५ वर्षीय यादव यांना शुक्रवारी रात्री श्वासोच्छ्वासास त्रास आणि अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना मेदांत इस्पितळात भरती करण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत आहेत. परंतु अजूनही निश्चित काही सांगता येणार नाही. दरम्यान, मुलायम यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून चिंतेचे काही कारण नाही, असे लखनौमध्ये सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. या आठवड्याच्या प्रारंभी यादव यांना लखनौस्थित संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्थेत भरती करण्यात आले होते. काही चाचण्यांनंतर रात्रभर रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवून सुटी देण्यात आली होती. सपा प्रमुखांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सैफईचा दौरा रद्द करून होलिकोत्सवाला लखनौमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)