शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पान १ -डॉक्टरची हत्या

By admin | Updated: December 1, 2015 00:25 IST

डॉक्टर महिलेने केली

डॉक्टर महिलेने केली
पतीची हत्या
नागपुरातील घटना : रागाच्या भरात केले छातीवर चाकूचे वार
नागपूर : रागाच्या भरात बेभान झालेल्या पत्नीने पतीच्या छातीवर चाकूचे वार केले. त्यात पतीचा मृत्यू झाला. ही थरारक घटना रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे, ही महिला व तिचा पती हे दोघेही पेशाने डॉक्टर असून पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
उदयनगर चौकाजवळील श्रीरामनगर येथे सिंचन विभागाचे निवृत्त अभियंता मधुकर रामचंद्र उके यांचे दुमजली निवासस्थान आहे. तळमजल्यावर मधुकर आणि त्यांची पत्नी मृदुलता राहतात. तर, पहिल्या मजल्यावर मुलगा रविकांतचा परिवार राहातो. रविकांत पॅथॅालॉजिस्ट होता. तर, त्याची पत्नी टिष्ट्वंकल (४०) दंत चिकित्सक म्हणून घरापासून काही अंतरावरच प्रॅक्टिस करते. त्यांना रुजल नामक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यात घरगुती कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता.
रविवारी रात्री त्यांच्यात अशाच कारणावरून कुरबूर सुरू झाली. अचानक रविकांतच्या किंकाळ्या ऐकू आल्यामुळे आईवडील वर धावले. तेवढ्यात टिष्ट्वंकल वरून खाली पळत आली. रविकांतची छाती रक्ताने माखली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी बाजूच्या खोलीत टिष्ट्वंकलचे वडील देखील होते.