शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

आमची आघाडी ‘किंगमेकर’ ठरणार!

By admin | Updated: October 6, 2014 04:42 IST

राज्यात एकाही राजकीय पक्षाचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीनंतर कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी तिसरा सहकारी सोबत घ्यावाच लागणार आहे

प्रश्न: विधानसभा निवडणुकीनंतरचे चित्र कसे असेल?आंबेडकर: राज्यात एकाही राजकीय पक्षाचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीनंतर कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी तिसरा सहकारी सोबत घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महाराष्ट्र लोकशाही आघाडी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल. आमची भूमिका धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या पक्षांसोबत जाण्याची असली तरी, निवडणुकीनंतरचे चित्र लक्षात घेऊन आघाडीचे घटक पक्ष सर्वसहमतीने निर्णय घेतील आणि तो भारिप-बहुजन महासंघाला मान्य असेल. प्रश्न: याचा अर्थ तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष वा शिवसेनेचेही वावडे नसेल, असा घ्यायचा का?आंबेडकर: राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युती आणि आघाडीच्या ताटातुटीमुळे, या निवडणुकीत जो उमेदवार ३५ ते ४० हजार मतं घेईल, तो विजयी होण्याची दाट शक्यता आहे. तेवढी आमची क्षमता असल्याचे, यापूर्वीच्या अनेक निवडणुकींमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये सिद्ध झाले आहे. आज किमान १४० मतदारसंघांमध्ये आमच्या आघाडीच्या उमेदवारांची स्थिती अतिशय चांगली आहे. आमच्या आमदारांची संख्या दोन आकड्यांमध्ये असेल हे नक्की! पण निवडणुकीनंतर नेमके काय चित्र समोर येते, यावरच पुढील वाटचाल अवलंबून असेल. प्रश्न: पण भाजपचे नेते तर त्यांचा पक्ष स्वबळावर सत्तेत येणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगत आहेत....आंबेडकर: राज्यातील भाजप नेते पूर्णत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून आहेत. मतं वळविण्याची क्षमता असलेला एकही प्रभावी नेता राज्यात भाजपकडे नाही. देवेंद्र फडणवीस यांना समोर केल्यास बहुजन समाज दुरावण्याचा धोका आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तर पंकजा मुंडे नवख्या आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे भाजपसाठी अतिशय कठीण आहे. प्रश्न: तुमची आघाडी चार प्रमुख पक्षांपेक्षा वेगळी कशी? आंबेडकर: सत्ताधारी पक्षानी पाच वर्षे विकासासाठी कोणतेही मोठे निर्णय घेतले नाहीत. भाजप, शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुढील पाच वर्षात काय करायचे, याचे कोणतेही नियोजन नाही. या सर्वच राजकीय पक्षांचा हेतू जनकल्याण हा नसून, केवळ ‘प्रॉफिट मेकिंग’ एवढाच आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाशी कुणालाही देणेघेणे नाही. मुंबई महापालिकेत शिवसेना गत अनेक वर्षांपासून सत्तेत असून, या पक्षाने आतापर्यंत रस्त्यांच्या कामांवर तब्बल पाच लाख कोटी रुपये खर्च केले आहेत; मात्र तरीही एमएमआरडीएचे रस्ते सोडले तर मुंबईतील रस्त्यांची अवस्था राज्यातील इतर रस्त्यांसारखीच आहे. मग यांना कॉंग्रेस-राकॉंवर रस्त्यांच्या मुद्यावरून टीका करण्याचा काय अधिकार? प्रश्न: यापुढील काळात या चळवळीचे भविष्य काय असेल? नेत्यांना बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेला एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात काय?आंबेडकर: रिपब्लिकन ऐक्याचा विषय मी माझ्यापुरता कधीच बाद करून टाकला होता. रिपब्लिकन ऐक्यासाठी मीदेखील प्रयत्न केले आहेत; पण केवळ स्वत:पुरता विचार करणाऱ्या नेत्यांमुळे काही होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे मी तो विषयच माझ्यापुरता संपवून टाकला. पटत नसूनही केवळ सत्तेच्या लालसेपोटी आजवर एकत्र असलेल्या युती आणि आघाडीतील घटस्फोटाच्या पाशर््वभूमीवर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागण्याची गरज आहे.प्रश्न: रिपब्लिकन पक्षाची शकले उडणे सुरूच राहिल्यास मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला राज्यात पाय रोवण्याची संधी मिळणार नाही का?आंबेडकर: मायावती यांच्यावर घोटाळ्यांचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे सध्या त्या केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. बहुजन समाज पक्ष चळवळीचा पक्ष राहिला नसून, व्यक्तीकेंद्रीत झाला आहे. बसपाची अवस्था आता रामदास आठवलेंसारखी झाली आहे. बसपाला महाराष्ट्रात जनाधार नसतानाही, राष्ट्रवादी कॉंँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ८० जागा देऊ केल्या होत्या; परंतु केवळ भाजपला नुकसान पोहचवायचे नाही या एकमेव उद्देशाने, बसपाने पवारांचा प्रस्ताव धुडकावून लावला.