शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही- अखिलेश

By admin | Updated: March 11, 2017 17:39 IST

आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल आणि निवडणुकीचा निकाल स्वीकारतो. यावेळी अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.ते म्हणाले, भाजप सरकार आमच्या पेक्षाही चांगलं काम करेल, अशी अपेक्षा करतो. मायावतींनी जर एश्टबाबत प्रश्न उपस्थित केले असतील, तर सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी जनतेनं भाजपाला मतदान केलं. नवं सरकार सपापेक्षा चांगलं काम कसं करणार हे मला पाहायचं आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसह देशातील शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होईल, अशी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, तर आनंदच होईल, असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 5 वर्षांत उत्तर प्रदेशला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवू, असंही अखिलेश यादव म्हणाले आहेत.अखिलेश यादवांनी अखेरपर्यंत मोदींना कडवी झुंज दिली होती. प्रत्येक मुद्यावर ते संयत भाषेत बोलायचे. तथापि वर्षभरापासून यादव कुटुंबात सुरू असलेला अंतर्कलह समाजवादी पक्षाच्या पराभवाला निश्चितपणे कारणीभूत ठरला आहे. याखेरीज अखिलेश यादवांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, मुझफ्फरनगरसह राज्याच्या विविध भागातल्या दंगली, नोकऱ्यांपासून सर्व क्षेत्रात यादव समाजाला मिळणारे प्राधान्य, आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे मतदारांची नाराजी मतदानातून स्पष्ट झाली आहे. (स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह)(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)उत्तर प्रदेशात काँग्रेसला भरघोस जागा मिळतील, अशा चमत्काराची अपेक्षा काँग्रेसजनांसह कोणालाही नव्हती. कारण राज्यात काँग्रेसचे नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी अवस्था अनेक वर्षांपासून आहे. देवरिया ते दिल्ली अंतराची राहुल गांधींची किसान यात्रा, जागोजागी झालेल्या खाटसभा आणि निवडणुकीतल्या प्रचार सभांचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. सोनिया गांधींसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी कुठेही हिंडले नाहीत. प्रियंका गांधी फक्त एका सभेत बोलल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बहुतांश उमेदवार समाजवादी पक्षाच्या भरवशावरच निवडणूक लढत होते.