शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

.. नाहीतर जांभळ्या रंगाचे जॅकेट घालून येईन - जया बच्चनची राज्यसभेत धमकी

By admin | Updated: May 11, 2016 10:26 IST

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत लक्ष न दिल्यास जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकीच दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 11 - समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत लक्ष न दिल्यास जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकीच दिली आहे. राज्यसभा उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी आपल्याकडे लक्ष देण्याची मागणी करताना जया बच्चन यांनी ही धमकी दिली आहे.
 
उत्तराखंड बजेटच्या मुद्यावर राज्यसभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु असताना राज्यसभा उपाध्यक्ष पी जे कुरियन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जया बच्चन यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 
 
'तुम्ही सिताराम येचूरी यांच्याशी बोलण्यात व्यस्त आहात, माझं ऐका...इतर पक्षांसोबत हा न्याय नाही, फक्त इतर पक्षातील लोक जोराने बोलत नाहीत, ओरडत नाहीत आणि सभागृहाच्या कामात अडथळा आणत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं', जया बच्चन यांनी म्हटलं आहे. 
 
'गेल्या तीन सत्रांपासून मी महिला कल्याणावर बोलण्याची मागणी करत आहे, मात्र मला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. उद्या मी जांभळ्या रंगाचा जॅकेट घालणार आहे जेणेकरुन तुम्ही माझ्या उपस्थितीची नोंद घ्याल. तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही. तुम्ही आमचं ऐकत नाही कारण तुम्ही काँग्रेसचे नवे नेते सिताराम येचुरी यांच्याशी बोलण्यात व्यस्त असता', असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.