शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा आम आदमी पार्टी न्यायालयात जाणार प्रीती शर्मा मेनन : एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घ्या

By admin | Updated: October 24, 2015 01:38 IST

जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणी निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. चौकशीपूूर्वी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घेतला नाही तर न्यायालयात याचिका दाखल करून सादरे कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार, अशी भूमिका आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी शुक्रवारी सायंकाळी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणी निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. चौकशीपूूर्वी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घेतला नाही तर न्यायालयात याचिका दाखल करून सादरे कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार, अशी भूमिका आम आदमी पार्टीच्या (आप) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी शुक्रवारी सायंकाळी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. शर्मा मेनन म्हणाल्या, सादरे यांच्या कुटुंबीयांची नाशिक येथे भेट घेतली. त्यात सादरे यांच्या कुटुंबीयांनी चौकशीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणी अजूनही सादरे यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी मोकाट आहे. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व निरीक्षक प्रभाकर रायते हे निलंबित झालेले नाहीत. सागर चौधरीला अटक झालेली नाही. महसूलमंत्री खडसे यांनी आपली वाळू माफिया सागर चौधरीशी ओळख नाही, असा दावा केला होता. परंतु खडसे व चौधरी हे खडसे यांच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामुळे खडसे या प्रकरणी खोटे बोलत आहेत. त्यांचा राजीनामा तातडीने घ्यायला हवा असे त्या म्हणाल्या. खान्देशाबाहेर कार्यरत आयपीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करामहसूल व पोलीस प्रशासन महसूल मत्र्यांच्या दबावात काम करते. त्यामुळे सादरे यांची आत्महत्या व जिल्‘ातील वाळूसंबंधीच्या प्रकरणांची चौकशी निष्पक्षपणे होण्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. खडसे यांनी सादरे आत्महत्येप्रकरणी राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु ते राजीनामा देत नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करावी आणि सादरे आत्महत्येच्या चौकशीसाठी खान्देशाबाहेर कार्यरत आयपीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही शर्मा मेनन यांनी केली.