ऑर्किड स्कूलचा विद्यार्थी संघटना पदग्रहण सोहळा
By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST
नाशिक : एकता, जबाबदारीची जाणीव व सातत्याने प्रगती गाठणे हे ऑर्किड स्कूलचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या शैक्षणिक व इतर गुणांमध्ये वृद्धी होण्यास जो पाया लागतो त्याची पायाभरणी स्कूलमध्ये केली जाते. ऑर्किड स्कूल येथे सर्व विद्यार्थ्यांची नेपच्यून, व्हिनस, ज्युपिटर, मार्स अशी चार संघात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाचा एक संघशिक्षक, संघप्रतिनिधी, संघप्रमुख व दोन उपप्रमुख ा प्रकारे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात येऊन विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. सर्व पदाधिकार्यांना कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या जबाबदारीची जाणून करून देणारी शपथ देण्यात आली.
ऑर्किड स्कूलचा विद्यार्थी संघटना पदग्रहण सोहळा
नाशिक : एकता, जबाबदारीची जाणीव व सातत्याने प्रगती गाठणे हे ऑर्किड स्कूलचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या शैक्षणिक व इतर गुणांमध्ये वृद्धी होण्यास जो पाया लागतो त्याची पायाभरणी स्कूलमध्ये केली जाते. ऑर्किड स्कूल येथे सर्व विद्यार्थ्यांची नेपच्यून, व्हिनस, ज्युपिटर, मार्स अशी चार संघात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाचा एक संघशिक्षक, संघप्रतिनिधी, संघप्रमुख व दोन उपप्रमुख ा प्रकारे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात येऊन विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. सर्व पदाधिकार्यांना कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या जबाबदारीची जाणून करून देणारी शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांची विचारसरणी बदलावी व निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेतृत्व व सांघिकरित्या कामे कशी करावी याचे बाळकडू विद्यार्थ्यांना देण्यात येते. ज्याद्वारे स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक होण्याची क्षमता त्यांच्यात उत्पन्न व्हावी हा यामागील उद्देश आहे.यावेळी सपकाळ नॉलेज हबचे सी. एम. डी. रवींद्र जी. सपकाळ व उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, प्राचार्य अनिल काश्यप, उपप्राचार्य डॉ. शिवकुमार तिवारी, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.(वा.प्र.)