शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एकमेव संस्कृत दैनिक संकटात!

By admin | Updated: June 13, 2016 07:50 IST

देशातील एकमेव संस्कृत दैनिक असल्याचा दावा करणाऱ्या ‘सुधर्मा’ या दैनिकाचा सध्या आर्थिक परिस्थितीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे

नवी दिल्ली : देशातील एकमेव संस्कृत दैनिक असल्याचा दावा करणाऱ्या ‘सुधर्मा’ या दैनिकाचा सध्या आर्थिक परिस्थितीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. हे दैनिक ४६ वर्षे पूर्ण करीत आहे, हे विशेष. म्हैसूर येथून प्रकाशित होणाऱ्या या दैनिकाचे संपादक संपत कुमार यांनी केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली असली तरी अद्याप त्यांना याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. या दैनिकाच्या सध्या तीन हजार प्रती छापल्या जातात. याबाबत बोलताना संपादक संपत कुमार म्हणाले, की आम्हाला मदतीची गरज आहे. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांंना लेखी कळविले आहे; पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, नागरिकांनी दैनिकासाठी मदत करावी, असे आवाहन या दैनिकात प्रकाशित करण्यात आले आहे. या आवाहनात म्हटले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आजच्या काळात दैनिकांचे अस्तित्व कायम राखणे आव्हानात्मक झाले आहे. आमचे वाचक आणि शुभचिंतक खप वाढविण्यासाठी सल्ले देत आहेत. या दैनिकाला नवे स्वरूप देणे आणि ‘सुधर्मा’ अर्धवार्षिक काढण्याचा विचार सुरू केला आहे. आम्ही एका रंगाची आॅफसेट मशिन खरेदी करणार आहोत. याची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे. हे स्वप्न साकार करण्यास आम्हाला आपल्या सहकार्याची गरज असल्याचे आवाहनही करण्यात आले.

> १९७० मध्ये सुरुवात... 

नागरिकांना केलेल्या आवाहनात संपादकांनी असेही म्हटले आहे की, ‘सुधर्मा’ हे दैनिक म्हणजे आमच्यासाठी उत्पन्नाचे साधन नाही. पत्रकारिता आणि संस्कृत याच्या आवड, इच्छाशक्तीचे हे फळ आहे. दरम्यान, ‘सुधर्मा’ या दैनिकाची सुरुवात संस्कृत विद्वान कालेले नदादूर वरदराजा आयंगर यांनी १९७० मध्ये केली होती. संस्कृत भाषेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा उद्देश होता.