शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या ३४ नावांनाच दिली मंजुरी

By admin | Updated: November 12, 2016 02:33 IST

देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत

नवी दिल्ली : देशातील विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीशपदासाठी ७७ नावांपैकी केवळ ३४ नावांना मंजुरी दिली असून, ४३ नावे पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठवली आहेत. याचाच अर्थ कॉलेजियमने सुचविलेल्या ४३ नावांना केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाहीे. एकूण ३४ नावांना मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मुख्य न्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्या. शिवकीर्ती सिंह आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठासमोर ही माहिती देण्यात आली. सरकारच्या वतीने न्यायालयात असेही सांगण्यात आले की, न्यायाधीश नियुक्तीच्या शिफारशींबाबत एकही फाईल प्रलंबित नाही. केंद्र सरकारकडून उपस्थित अ‍ॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी पीठाला सांगितले की, ३४ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ४३ शिफारशी पुनर्विचारासाठी कॉलेजियमकडे पाठविण्यात आल्या आहेत, तर केंद्राने यावर्षीच ३ आॅगस्ट रोजी कॉलेजियमकडे विचारासाठी मेमोरेंडम आॅफ प्रोसिजरचा नवा मसुदा (एमओपी) पाठविला होता; पण आतापर्यंत सरकारला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, १५ नोव्हेंबर रोजी कॉलेजियमची बैठक बोलविण्यात येईल. कॉलेजियममध्ये मुख्य न्यायाधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश असतात. १९७१ च्या युद्धात सहभागी लेफ्टनंट कर्नल अनिल कबोतरा यांच्याकडून दाखल जनहित याचिकेवर सुनावणीची तारीख १९ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. कॉलेजियमच्या शिफारशीनंतर उच्च न्यायालयातील नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते, तर न्यायालयाने असेही बजावले होते की, प्रसंंगी पंतप्रधान कार्यालय, कायदा मंत्रालयाच्या सचिवांना आम्ही बोलवू शकतो. (लोकमत न्यूज नेटकर्व)