शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काही क्षणांसाठी थेट मृत्यूलाच आव्हान ! भाग २

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळा

चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळा
चालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे ॲक्ट १५६ नुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशा वेळी एखाद्या प्रसंगी प्रवाशाचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. परंतू प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वेगाडी सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढण्याची गरज आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करून आपल्या जीविताचे रक्षण करण्याची गरज आहे.

रेल्वे रुळ ओलांडणे मृत्यूला आमंत्रण
रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे रेल्वे ॲक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. अनेकदा प्रवासी फूट ओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडतात. रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला हक्क रेल्वेगाडीचा आहे. परंतू अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून थेट रेल्वे रुळ ओलांडतात. रुळावरून येणाऱ्या रेल्वेगाडीखाली चेंगरून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजचा वापर करणे गरजेचे आहे.

बर्थचे आमिष दाखवून लूट
अनेकदा प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. परंतू असे प्रवासी हेरून रेल्वेस्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का अशी विचारणा करतात. प्रवाशाने होय म्हटले की त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. मात्र त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे अनेक प्रवाशांची लूट झाल्याची उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतू ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते.

धार्मिक भावनांना हात घालून फसवणूक
अनेकदा सोबत प्रवास करीत असलेल्या सह प्रवाशांकडूनही लूट होऊ शकते. असे प्रवासी गप्पा मारून आपल्याला बोलते करतात. तीर्थयात्रेला गेल्याचे सांगतात आणि थोड्याच वेळात जवळच्या प्रसादाच्या डब्यातून प्रसाद खाण्यास देतात. अनेकजण व्यक्ती धार्मिक असल्यामुळे हा प्रसाद घेऊन त्वरित खातात. परंतु सावधान प्रसादाच्या नावाखाली दिलेल्या खाद्यपदार्थातही गंुगीचे औषध असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासात कुणी देवाचा प्रसाद दिला तरीसुद्धा तो टाळणे हाच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय आहे.