शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिपायासाठीही ऑनलाइन फॉर्म, मग पीजीला का नाही ?- कुलगुरूंचा सवाल

By admin | Updated: May 11, 2016 18:56 IST

अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतन लाल हंगलू यांनी युनिव्हर्सिटीच्या कामकाजामध्ये राजकारण्यांच्या होणा-या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवला

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतन लाल हंगलू यांनी युनिव्हर्सिटीच्या कामकाजामध्ये राजकारण्यांच्या होणा-या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवला आहे. कुलगुरू यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एडमिशनसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या निर्णयाला राजकीय दबावामुळेच बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. यावेळी कुलगुरूंनी राजनैतिक हस्तक्षेपावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हंगलू यांच्या मते मोदी एकीकडे डिजिटल इंडिया करण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र इथं प्रोस्ट ग्रॅज्युएशन करणा-या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा नाही. हल्ली शिपाईच्या पदासाठीही ऑनलाइन फॉर्म भरावा लागत असल्याचंही उदाहरण कुलगुरू हंगलू यांनी दिलं आहे.    
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्तक्षेपावरही अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रतनलाल हंगलू नाराज असून,  कुलगुरूंनी राजीनामा देण्याचीही धमकी दिली आहे. भाजप सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच त्यांची कुलगुरू पदावर नियुक्ती केली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी युनिव्हर्सिटीची स्वायत्तता संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र स्मृती इराणींनी संसदेत यावर भाष्य करताना हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हल्लीच हंगलू यांनी सर्व प्रवेश परीक्षा ऑनलाइन केल्या होत्या. मात्र स्मृती इराणींनी त्या बदलून पुन्हा ऑफलाइन केल्या आहेत. वाइस चान्सलर हंगलूंनी विद्यार्थी संघटनेचे नेते अवैधरीत्या फॉर्म विकून काळा पैसा कमवत असल्याचाही आरोप केला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ऑनलाइनची सुविधा दिली होती, असं हंगलूंनी सांगितलं आहे. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय युनिव्हर्सिटीमध्ये दखल देत नसून, समाजवादी पार्टीचे नेते कुलगुरू रतनलाल हंगलूंना धमक्या देत असल्याचं वक्तव्य यावेळी स्मृती इराणींचे एसपी महासचिव रामगोपाल यादव यांनी दिली आहे.