कृष्णा नदीत एकाची आत्महत्या
By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील बाबू सिद्धू पुजारी (वय ५५, रा. धनगरगल्ली) यांनी अंकली पुलावरून उडी घेऊन कृष्णा नदीपात्रात आत्महत्या केली. याची नोंद येथील पोलीस ठाण्यात झाली. सोमवारी (दि. २) पहाटे मृतदेह बाहेर काढण्यात आला. रविवारी (दि. १) रात्री साडेअकराच्या सुमारास बाबू पुजारी हे उदगाव-अंकली नवीन पुलावर गेले होते. यावेळी त्यांनी शिवराज पुजारी (रा. गडमुडशिंगी) यांना मोबाईलवर फोन करून आपण अंकली पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास कृष्णा नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबतची वर्दी संदीप पुजारी (रा. उदगाव) यांनी पोलिसांना दिली.