शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकास अटक

By admin | Updated: October 30, 2016 02:16 IST

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने शनिवारी आणखी

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने शनिवारी आणखी एका इसमाला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते.फाहत असे त्याचे नाव नाव असून तो समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य मुनावर सलीम यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याला खासदार मुनावर सलीम यांच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. कसून चौकशी केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. तो खा. सलीम यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करीत होता. त्याची आम्ही आणखी चौकशी करीत आहोत. त्यांच्या चौकशीतून जी नावे समोर आली आहेत, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानी उच्चयुक्तातील अख्तरशी फहत याच संबंध होते आणि तोही काही गुप्त माहिती अख्तरला देत होता, असे प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळून आले आहे. त्याच्या अटकेनंतर पोलीस कदाचित खा. मुनावर सलीम यांच्याकडे जातील आणि त्यांच्याकडून काही माहिती घेतील, अशी शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी मोहम्मद अख्तर या पाकिस्तानी अधिकाऱ्याला दिल्लीतील प्राणी संग्रहालयातून ताब्यात घेण्यात आले होते. तिथे त्याला भेटण्यासाठी आलेल्या दोन राजस्थानी नागरिकांनाही नंतर पोलिसांनी अटक केली.भारतीय सैन्याच्या तैनातीविषयी तसेच बीएसएफच्या चौक्यांसंबंधीची माहिती ते दोघे या अधिकाऱ्याला देत असत, असे उघडकीस आले होते. त्यांच्याबरोबर राजस्थानचा आणखी एक जण होता. पण तो त्यावेळी उपस्थित नव्हता. मात्र दोघांच्या चौकशीतून त्याचे नाव व माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोएबला या पासपोर्ट व व्हिसा एजंटला अटक केली. याआधी शुक्रवारी राजस्थानमधून पाकिस्तानी हेर शोएबला अटक करण्यात आली होती. तसंच पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरला मदत करणा-या मौलाना रमजान आणि सुभाष जांगड या दोघांना गुरुवारी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)सुरजित सिंग भारतात परतलेमोहम्मद अख्तर यांना ४८ तासांत देश सोडण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिल्या होत्या. त्याप्रमाणे तो आज भारतातून निघून गेला. भारताने त्याची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तातील सुरजित सिंग यांना देश सोडण्यास सांगितले होते. तेही आज तेथून निघून भारतात परत आले.