सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
कसबे डिग्रज (सांगली) : मगरीने केलेल्या हल्ल्यात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एक जण गंभीर जखमी झाला. कृष्णा नदी पाणवठ्यावर रविवारी सकाळी सात वाजता ही थरारक घटना घडली. याठिकाणी पोहायला आलेल्या युवकांनी प्रतिकार करून मगरीच्या तावडीत सापडलेल्या या व्यक्तीची सुटका केली.
सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी
कसबे डिग्रज (सांगली) : मगरीने केलेल्या हल्ल्यात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एक जण गंभीर जखमी झाला. कृष्णा नदी पाणवठ्यावर रविवारी सकाळी सात वाजता ही थरारक घटना घडली. याठिकाणी पोहायला आलेल्या युवकांनी प्रतिकार करून मगरीच्या तावडीत सापडलेल्या या व्यक्तीची सुटका केली.उमराव घाटगे (४६) हे मुलासोबत नदीत पोहायला गेले होते. पोहून झाल्यावर मुलास नदीकाठी पाठविले आणि ते नदीतच गुडघाभर पाण्यात उभे होते. त्यावेळी मगरीने त्यांचा डावा पाय पकडला. घाटगे यांनी आरडाओरड केल्यानंतर मोहन कदम, अभिजित लवटे, दीपक गिड्डे, विश्वास माळी, शशिकांत करंटे या युवकांनी यांनी घाटगे यांना पकडून धरले. त्यामुळे मगरीला घाटगे यांना पाण्यात ओढून देता आले नाही. तरी इतरांनी दगड मारल्यामुळे मगरीने घाटगे यांना सोडून पाण्यात पलायन केले. (वार्ताहर)या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उमराव घाटगे यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तास शस्त्रक्रिया सुरु होती. यामध्ये त्यांना ५२ टाके घातले आहेत. वन अधिकार्यांनी घाटगे यांचा जबाब घेतला असून त्यांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले आहेत.------हल्ले वाढलेगेल्या तीन-चार महिन्यांत भिलवडी, औदुंबर, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, ब्रानाळ या कृष्णा काठावर मगरीकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. मगरीच्या हल्ल्यात एका शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. तर एक मच्छिमार व महिला गंभीर जखमी झाले होते. वनविभागाने केेलेल्या सर्व्हेमध्ये नदीमध्ये अकरा अजस्त्र मगरी व ७० पिल्ले असल्याचे आढळून आले आहे. महिन्यापूर्वी ब्रानाळ येथे नदीकाठावर ११ जिवंत पिल्ले आढळून आली होती.