शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार

By admin | Updated: July 30, 2016 02:03 IST

विविध राज्यात सध्या पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर गुडगावात तब्बल १५ ते २० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा

गुडगाव/बंगळुरू : विविध राज्यात सध्या पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर गुडगावात तब्बल १५ ते २० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दुसरीकडे बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार माजला असून, शहरात चार दिवसांत शहरात १९५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. तर बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा थेट वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बंगळुरुत अनेक भागात पाण्यामुळे नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोटींची मदत घेण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचारी वाहनांच्या या कोंडीत फसले गेले. अनेक शाळा आणि कार्यालयांनीही त्यामुळे शुक्रवारी सुटीच जाहीर केली. वाहनांची ही कोंडी एवढी वाढत गेली की, अनेक दुचाकीस्वारांनी आपले वाहन तेथेच सोडून देत दिल्ली - जयपूर रोडच्या दोन्ही बाजंूनी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढला. गुरुवारी या भागात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे मुख्य नालीचे पाणी थेट रस्त्यांवर आले. रात्रीपासूनच तुंबलेल्या पाण्याची ही समस्या सुरु झाली. दिल्ली- जयपूर रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य मार्ग एनएच-८ वर शेकडो ट्रक फसलेले आहेत. सकाळी या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानंतर ही कोंडी प्रचंड वाढली. (वृत्तसंस्था)गुडगावमध्ये कलम १४४राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर वाहतूक जाम झाल्यानंतर हजारो प्रवासी अडकले आहेत. दरम्यान, ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी गुडगावचे उपायुक्त टी. एम. सत्यप्रकाश यांनी हीरो होंडा चौकात कलम १४४ लागू केले आहे. नायडू - खट्टर यांच्यात चर्चा गुडगावमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास आवश्यक ते पाउले उचलण्याचे त्यांनी सूचित केले. नायडू म्हणाले की, नाल्यांचे काम न केल्यामुळे उद्भवली आहे. गुडगावमधील ट्रॅफिक जामचे खापर भाजपा दुसऱ्यांवर फोडत आहे. प्रवासी आणि विशेषत: अ‍ॅम्बुलन्स यांच्यासाठी तर ही अग्निपरीक्षा आहे. कारण, अनेक तासांपासून लोक येथे अडकले आहेत. - राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँगे्रसमनोहरलाल खट्टर सरकार गुडगावमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र व राज्यातही त्यांचेच सरकार आहे. गत २४ महिन्यात आपण काय केले? वीज, पाणी आणि रस्ते या सुविधा नसतानाही भाजपाने इमारतींच्या विस्तारास परवानगी दिली.- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस